Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत विकासाचे मंदिर व्हावे हाच दृष्टिकोन - प्रवीण शिंदे

कामशेत- ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे मध्ये एक नवीन उमेद घेऊन वार्ड क्रमांक सहा मध्ये प्रवीण चिल्हारी शिंदे हा युवक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विकासाचा दृष्टिकोन ठेवून उभा आहे.लहानपणापासून संघस्वयंसेवक,जनसामान्यात मिसळलेला सुशिक्षित घरातील युवक यावेळी निवडणुकीच्या रणांगणावर उतरला आहे.

         कामशेत शहरातील एक युवा उद्योजक म्हणून प्रविणची ओळख आहे. कामशेत शहरातील शेती व उद्योग क्षेत्रात नावलौकिक असणारे आदर्श कुटुंब, मल्हारी शिंदे यांचे ते पुतणे आहेत.शंभु मोबाईल शॉपीच्या माध्यमातून बंधू अर्जुन शिंदे,बळीराम शिंदे सतत जनतेच्या संपर्कात असतात.पक्षश्रेष्ठीकडे वेळोवेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी मागितली पण पक्षाचा आदेश सर्वमान्य मानून मिळेल ती जबाबदारी पार पाडली.३०-३५ वर्षानंतर त्यांना वार्ड क्रमांक सहा मधून उमेदवारी दिली आहे. 
        यावेळी प्रविण यांना वसुंधरा न्युज प्रतिनिधी यांनी विचारले असता.कामशेत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी आणि कामशेत शहराचा विकास व्हावा असं मला वाटतं होते.तसा प्रत्यन आमचे ज्येष्ठ नेते माऊलीदादा शिंदे,मा.सभापती राजाराम शिंदे,सुकन बाफना,शंकरनाना शिंदे,संतोश कुंभार,चंद्रकांत दौंडे, विजय शिंदे,अभिमन्यू शिंदे यांनी केला पण त्याला यश आले नाही.ग्रामपंचायत निवडणूकमध्ये एक विकासाचा दृष्टिकोन ठेवून निवडणूक लढवत आहे.ग्रामपंचायत हे विकासाची मंदिर व्हावे हीच मनामध्ये इच्छा ठेवून काम करणार आहे.वेळ प्रसंगी स्व:निधीतून कामे करावी लागली तरी मी करेल.संधी मिळाली तर नक्कीच संधीचे सोने करणार "असे यावेळी सांगितले .
           ग्रामपंचायत खडकाळे वार्ड क्रमांक सहा प्रभागामध्ये इंद्रायणी कॉलनी, पंचशील कॉलनी, गरुड कॉलनी, गणेश वाडी, दौंडे कॉलनी ,कुसगाव रोड भाग असून भाजप,आरपीआय मित्र पक्ष पुरस्कृत "परिवर्तन पॅनलच्या" वतीने प्रवीण चिल्हारी शिंदे, मोहन दिनकर वाघमारे, संतोष कदम असे उमेदवार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या