कामशेत - ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे निवडणूक मधे प्रभाग सहा मधे एकुन २१ उमेदवार यांनी अर्ज दाखल केला होता त्या पैकी १० इच्छुक उमेदवार यांनी अर्ज माघारी घेतला असुन निवडणुकीच्या रण मैदानात आता ११ उमेदवार उभे आहे.
प्रभागात मोठी लढत होणार आहे. परिवर्तन पँनल यांनी आपला कोणताही उमेदवार अपक्ष राहू नये याची खबरदारी घेत उमेदवार यांचे मन वळवण्यास यशस्वी ठरले.
दि.४ रोजी चिन्ह वाटप झालेने निवडणूकीचे आज चित्र स्पष्ट झाले सर्वात मोठा वॉर्ड क्रमांक सहा असुन तेथे प्रभाग मतदार संख्या २१६१ आहे.
तेथे परिवर्तन पॕनल ,आर पी आय मित्र पक्षाच्या वतीने प्रविन चिल्हारी शिंदे ,मोहन दिनकर वाघमारे ,संतोष चंद्रकांत कदम यांचा प्रचाराचा नारळ गणेश मंदीरात वाढऊन प्रचाराची सुरवात करण्यात आली या वेळी भाजपा जेष्ठनेते माऊली शिंदे,मा.सभापती राजाराम शिंदे,मा.सुवर्णा कुंभार,संतोष कुंभार ,मा.सरपंच जनाबाई पवार,शंकर ठोसर,अभिमन्यु शिंदे,शशिकांत शिंदे,रमेश बच्चे,शिरसट मामा,बाळासाहेब गायकवाड,संदीप साठे ,सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते
0 टिप्पण्या