कामशेत - श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण साठी देशातून रामभक्त निधी संकलन करीत आहे. कामशेत मधे ही निधी संकलन केंद्र चालू झाले असून याचे उद्घाटन दिनांक २२ /१/२०२१रोजी साईबाबा चौक, कामशेत मोरेश्वर फुगे यांच्या दुकानाच्या येथे केंद्र करण्यात आले आहे.
कामशेत शहरात जनजागृती करण्यासाठी दि.२६/१/२०२१ प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली पंडित नेहरू विद्यालय कामशेत पासून ते छत्रपती शिवाजी चौक ,छत्रपती संभाजी चौक ,श्री विठ्ठल मंदिर अशा मार्ग क्रमनाने होणार आहे याचे नियोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कामशेट यांनी केले आहे तरी सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
(टिप- येताना सायकल घेऊन येणे)
0 टिप्पण्या