तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे येथील आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुशील सैदाने यांचा विजय झाल्याने त्यांची आज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नगरपालिकेची सत्ता पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावेळी मोठा जल्लोष करण्यात आला. विद्यमान आमदारांच्या सत्तेत असलेल्या नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा आपले पाय रोवले आहेत. विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाला देत बाळा भेगडे यांच्या नेतृत्वात पुन्हा नगरपालिका भाजपच्या ताब्यात आली आहे.
सदर निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादीच्या वतीने अरुण बबन माने, संतोष छबुराव भेगडे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुशील सैदाने यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे संतोष छबुराव भेगडे यांनी माघार घेतल्याने भाजपचे सुशील सैदाने आणि राष्ट्रवादीचे अरुण माने यांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीचे अरुण माने यांना ७ सदस्यांनी पाठिंबा दर्शविला आणि भारतीय जनता पार्टीचे सुशील सैदाने यांना १३ सदस्यांनी पाठिंबा दर्शविला या वेळी जनसेवा विकास समितीचे सर्व नगरसेवक अनुपस्थित होते. उपनगराध्यक्षपदी सुशील सैदाने यांची निवड करण्यात आली.
0 टिप्पण्या