राजमाची मावळ :-भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने खेळ रंगला पैठणीचा व हळदी कुंकू तसेच आदिवासी मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन लोणावळा शहरा पासून 19 किलोमीटर दूर दुर्गम भागात असणारे आदिवासी समाजाचे गाव राजमाची याठिकाणी करण्यात आले होते.
सदर ठिकाणी हा कार्यक्रम घ्यायचा प्रमुख हेतु शहरी भागांत असे अनेक कार्यक्रम होतात.परंतु अशा दुर्गम भागात असे कार्यक्रम किंवा उपक्रम होत नसतात अशी खंत येथील महिलांना होती. म्हणून याठिकाणी खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात तरुण मुलीन पासून अनेक वयोवृद्ध महिलांनी सहभाग घेतला.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राजमाता जिजाऊ महिला मंच मावळ तालुका अध्यक्ष सारीका संजय भेगडे, सभापती निकिता ताई घोटकुले,मा.सभापती सुवर्णा कुंभार,पंचायत समिती सदस्य जिजाबाई पोटफोडे,ज्योती शिंदे ,डॉ उज्वला रवींद्र भेगडे,प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,राजमाची गावच्या सरपंच प्रगती वरे, नगरसेवक विशाल पाडाळे लोणावळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी,माजी सरपंच कृष्णा घिसरे,वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले,दत्तात्रय कोंढभर,नाणे मावळ महिला आघाडी अध्यक्ष सिमा आहेर तसेच ग्रामस्थ व महीला भगीनी उपस्थितीत होत्या.
प्रथम क्रमांक:-पैठणी चंदा किरण वरे
द्वितीय क्रमांक:-सोन्याची नथ सुनिता सुभाष वरे
तृतीय क्रमांक:-चांदीची जोडवी हिराबाई एकनाथ वरे तसेच राजमाची गावातील प्रत्येक महीलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष सायली बोत्रे व भाजपा महिला आघाडी मावळ तालुका यांच्यावतीने करण्यात आले होते.स्वागत कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव तसेच प्रास्ताविक सायली ताई बोत्रे व आभार तालुका सरचिटणीस वैशाली ढोरे यांनी केले.
0 टिप्पण्या