Ticker

6/recent/ticker-posts

देवा गायकवाड जनतेची सेवा करणारा युवक - इंदोरीकर महाराज


कामशेत दि २८ - काब्रे नामा येथे देवा गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त प्रबोधन किर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांचे कीर्तनाचे आयोजन केले होते. किर्तनामधे 10000 च्या वर श्रोत्यांनी गर्दी केली होती देवा गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी मावळ तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाले होते यामध्ये मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, मा. आमदार दिगंबर भेगडे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,संचालक बाळासाहेब नेवाळे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, जेष्ठनेते माऊली शिंदे, मा.सभापती राजाराम शिंदे, गणेश गायकवाड,ह.भ.प.तुषार दळवी,गायनाचार्य अरुण येवले, मृदंगाचार्य संतोष घनवट, बाबाजी काटकर आदी सरपंच,विविध पक्षाचे प्रतिनिधी ,काब्रे ग्रामस्त , मावळ तालुक्यातील किर्तनकार ,गायक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांनी देवा गायकवाड हा जनसेवा करणारा तरुण असुन त्याच्यामागे महिला भगिनींचे आशीर्वाद आहेत असे उद्गार यावेळी काढले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या