मावळ ,दि.१८ - मावळ तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ५७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका मधे हाती आलेल्या निकालानुसार तालुक्यातील ग्रामपंचायत मधे भाजपा आर पी. आय .पार्टी , मित्र पक्षाचे पॅनल विजय झाले.
ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाच्या ४८२ जागांसाठी निवडणूक पार पडली त्यापैकी २७२ जागांवर भारतीय जनता पार्टी व आरपीआय पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सदस्य म्हणून निवडून आले आहेत "गाव पातळीवर काम करणाऱ्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडणुकीतील यश शक्य झाले आहे असे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी सांगितले" ग्रामपंचायत निवडणुकीतून भारतीय जनता पार्टी वर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
भारतीय जनता पार्टी बहुमत मिळवलेल्या ग्रामपंचायतीची यादी १) माळेगाव बुद्रुक २) इंगळुन ३) कशाळ ४)कुसवली ५) घोनशेत ६)नाणे ७)कांब्रे नामा ८)गोवित्री ९)शिरदे १०) चिखलसे ११)अजीवली १२) तिकोना १३)मोरवे १४)शिवली १५)सांगवडे १६)आढले बुद्रुक १७)वेहरगाव १८)कुरवंडे १९) ताजे २०)पाटण २१) २२)महागाव २३)अपटी २४) ऊर्से २५)परंदवडी २६)धामणे २७)साई २८)आंबी २९)साते ३०)खांडसी ३१)कुजगाव बु" ३२)तोरणे ३३)येलघोल ३४)पाचाने ३५)नवलाख उंबरे ३६)आढे ३७)गहूंजे ३८)उकसान ३९)कोथुर्ने
0 टिप्पण्या