कार्ला:- मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाली असून या पार्श्वभूमीवर गावातील इच्छुकांची ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.काही गावांमध्ये निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
लोणावळा ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मा. लवटेसाहेब यांनी दहिवली-वेहेरगाव ग्रुप ग्रामपंचायत वार्ड क्रमांक -३ मध्ये सर्व ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी त्यांचे गडचिरोलीला पोस्टिंगच्या दरम्यानचे अनुभव सांगितले आणि प्रामुख्याने त्यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले की तरुणांनी स्पर्धा परीक्षेकडे करिअर म्हणून बघण्याची गरज आहे आणि प्रत्येक गावात स्पर्धा परीक्षा अभ्यास वर्ग असावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
गावातला तरुण सरपंच,सदस्य होण्यापेक्षा तो जिल्हाधिकारी,तहसीलदार कसा होईल याबद्दल मार्गदर्शन केले.
गावची निवडणूक बिनविरोध झाली तर उत्तम आहे नाही झाली तर ती लोकशाही मार्गाने शांततेत व्हावी असे आव्हान त्यांनी केले.
यावेळी त्यांच्या समवेत मा.बोकड साहेब,होमगार्ड अनिकेत पाटील उपस्थित होते प्रसंगी प्रस्तावना मा.सरपंच सचिन येवले,पोलीस पाटील सागर येवले व आभार तानाजी पडवळ यांनी मानले.
0 टिप्पण्या