Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत ग्रामपंचायत बिनविरोध होणार का ?सर्वसामान्य जणतेचा प्रश्न ...


कामशेत - खडकाळे (कामशेत )  ग्रामपंचायत मावळ तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून कामशेत शहरात रणधुमाळी सुरू झाली आहे .सामान्य जनतेचा आवाज हा कामशेत ग्रामपंचायत  निवडणूक ही बिनविरोध व्हावी असे फेसबुक व्हाट्सअप वर काही नागरिक प्रतिक्रिया देत आहे काहींच्या मते निवडणूक बिनविरोध होऊन यातून मिळणारा पैशातुन कचऱ्यासाठी जागा विकत घ्यावी असे काही मत मांडले आहे .

           कामशेत शहरात प्रामुख्याने मुख्य लढत ही भाजपा पुरस्कृत आणि मित्र पक्ष परिवर्तन पॅनल विरुद्ध महाविकासआघाडी पुरस्कृत दिलीप टाटीया पॅनल अशी लढत होणार आहे. नामनिर्देशन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाले असल्याने प्रत्येक जण उमेदवारी मिळण्यासाठी धावपळ चालू आहे .
          
         अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध  होऊ शकते का ? असा सर्वसामान्यांचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये चालू आहे यावर भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरनाना शिंदे यांना विचारले असता त्यांनी कामशेत शहराच्या विकासासाठी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमची कधीही तयारी असुन तसा प्रस्तावदेखील दिला आहे. या बाबत पुढील निर्णय हा इतर पक्षाच्या प्रतिनिधी यांनी घ्यावा असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या