कामशेत:-भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री संजय (बाळासाहेब) भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग आधार फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच विकास भाऊ लिंबोरे यांच्या स्वखर्चाने कामशेत येथील दिव्यांग लाभार्थी राजकुमार चिंधु सावळे यांना घरावरील दुरुस्तीसाठी सिमेंट पत्रे देण्यात आले.
यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी मावळ अध्यक्ष विकास भाऊ लिंबोरे,भाजपा दिव्यांग आघाडी मावळ प्रभारी संतोष भाऊ राजीवडे,प्रहार मावळ तालुका सरचिटणीस गणेश भाऊ रोहमारे,झुंज दिव्यांग संघटना महिला आघाडी नूतन रोहमारे उपस्थित होते.
यावेळी विकास लिंबोरे यांनी दिव्यांग आधार फाउंडेशन यांच्या माध्यमातून गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना घर दुरुस्ती साठी पुढील काळात मदत करण्याचा मानस व्यक्त केला.
0 टिप्पण्या