मावळ -महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत वहाणगाव येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. कृषी सहायक श्री.पवार यांच्याकडून मातीचे आरोग्य कसे राखायचे हे प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्या मातीमध्ये कोणते पीक घ्यायचे व माती परीक्षण कश्या पद्धतीने करायचे ही सविस्तर माहिती देण्यात आली.माती परीक्षण केल्यावर मातीमधील विविध घटकांची माहिती होत असते व त्या मातीमध्ये कोणत्या घटकांची कमी आहे हे समजते.
जागतिक मृदा दिन साजरा करण्यासाठी श्री विठ्ठल वाडेकर, मच्छिंद्र वाडेकर, शिवाजी वाडेकर, दत्तोबा वाडेकर,दशरथ वाडेकर, वसुदेव तनपुरे, पंढरीनाथ तनपुरे, शाहिदास वाडेकर, विठ्ठल तनपुरे,गुलाब तनपुरे, प्रवीण कुडे, सुशिल वाडेकर इत्यादी कृषी व मृदा प्रेमी उपस्थित होते,उपस्थितांचे स्वागत श्री काळूराम वाडेकर यांनी व आभार श्री मुकुंद पवार यांनी केले.
0 टिप्पण्या