Ticker

6/recent/ticker-posts

करूंजमध्ये कातकरी वस्तीवर देव दीपावली उत्सव साजरा

मावळ ( पुणे ) विश्व हिंदु परिषद बजरंग दल मावळ तालुक्याच्या वतीने राऊत वाडी येथील कातकरी वाडीवर देव दिवाळी साजरी करण्यात आली. 
गेली २० वर्ष मावळ तालुक्याती खेड्या पाड्यातील आदिवासी पाड्यांवर जाऊन, जात-पात, शहर - गाव, उच -निच असा भेदभाव न करता सकल हिंदु समाज हा एकच आहे हा एकिचा संदेश देन्याच काम या उपक्रमाच्या माध्यमातुन केल जाते . या वाड्या वस्त्यांवरील बांधवांना समाज्यासी जोडुन घेवुन मुख्य प्रवाहात आण्यासाठी प्रयत्न केला जातो. 
संपूर्ण वस्तीवर स्वच्छता केली गेली, प्रत्येक घरापुढे रांगोळी काढली जाते, पणत्या लावण्यात आल्या. आकाश कंदिल लावले गेले. दिवाळीचा फराळ घरा घरात वाटप केला गेला शेकडो कार्यकर्ते , गावातील ग्रामस्त, वाडीवरील बांधव, माता भगीनी एकोप्याने भेदभाव विसरुन एकत्र आनंदात कार्य करत होते. सर्व लहानग्यांना फटाके देण्यात आले. त्या लहानग्यांच्या चेहर्यावरील समाधान पाहण्या सारख होते . स्थानीक बांधव आणि बजरंगदलाचे कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र येवुन जेवन बनवले. एकमेकांना वाढत एकीचा संदेश दिला. या कार्यक्रमाला वारकरी सांप्रदाय, स्थानीक सामाजीक संघटना, बजरंगदलाचे कार्यकर्ते ,विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
या कार्यक्रमात विश्व हिंदु परिषद बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक मा. संतोषभाऊ भेगडे पाटिल यानी आपण सगळे एकच आहोत. आपण सगळे भारत मातेची लेकर असुन माता आपल्या मुलांमध्ये कधीही भेदभाव करत नाही. आपण सर्वजन एकत्र येवुन आदिवासी समाज्याच्या प्रगती साठी प्रयत्न करु अस आश्वासन देखील दिलं. तसेच रावुत वाडी येथील कातकरी वस्तीवर प्रभु श्री राम मंदिर उभारणीचा संकल्प केला आणि लगेच तळेगावातील उद्योजक रविंद्र काळोखे यांनी 51 हजार रुपयांची देणगी राम मंदिर उभारणी साठी दिली. 
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन जिल्हा संयोजक बाळासाहेब खांडभोर यांनी केले. हभप संतोष महाराज कुंभार, हभप दत्ता महाराज शिंदे, जिल्हा मंत्री दयानंदजी शिंदे, स्थानीक युवक संतोष जाधव, विहिप मावळ तालुका अध्यक्ष गोपिचंद महाराज कचरे यांनी मार्गदर्शन केले. विभाग संयोजक संदेश भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले. 
या वेळी जिल्हा उपा अध्यक्ष सुधिर राईलकर, अमित भेगडे , महेद्र असवले, सुशिल वाडेकर, प्रशांत ठाकर , ओंकार भेगडे, अभिमन्यु शिंदे, अर्जुन शिंदे, सुधिर दहीभाते, निलेश ठाकर, सागर घायाळ, सचिन शेलार, साई डांगले, विश्वास दळवी, उमेश लगड, लहु मोरमारे, संभाजी पाटिल , प्रदिप मालुसरे आदी कार्यकर्ते, स्थानीक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या