Ticker

6/recent/ticker-posts

कामशेतमध्ये आत्मनिर्भर योजनेअंतर्गत पथ्यविक्रेते यांना १०००० लोन वाटप....तसेच युवा उद्योजक यांना दहा लाखापर्यंत लोन उपलब्ध होण्याची संधी.....


कामशेत- मोदी सरकारने राबवलेल्या "आत्मनिर्भर भारत"
या संकल्पनेतून पथ विक्रेते म्हणजेचं भाजी-फळे,तयार खाद्यपदार्थ,चहा-वडापाव,कापड,वस्त्र,चप्पल,पुस्तके स्टेशनरी या विक्रेत्यांना तसेच केशकर्तनालय,चर्मकार ,पान दुकान, कपडे धुण्याचे दुकान,फेरीवाले यांना दहा हजार रुपये एवढे खेळते भांडवल कर्जरूपाने उपलब्ध होणार आहे.तसेच युवकांसाठी नवीन उद्योग उभारण्यासाठी भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी मुद्रा लोन ,शेती संदर्भात लोन उपलब्ध करून दिले जाणार आहे .हा कार्यक्रम  दि.९/१२/२०२० रोजी श्री गणेश मंगल कार्यालय ,कामशेत बाजारपेठ स.१० वाजता* होणार आहे

              यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कामशेत व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संजय तथा बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, विविध आघाडी यांचे प्रतिनिधी ,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,मा.उपसरपंच गणपत शिंदे, शहराध्यक्ष मोहन वाघमारे,युवा अध्यक्ष  प्रफुल्ल गदिया,व्यापारी अध्यक्ष बिपिन बाफना,रमेश बच्चे,मा.सरपंच सारिका शिंदे सारिका घोलप,समीर भोसले,शंकर पिंगळे ,श्रीहरी गायकवाड,युवराज शिंदे,प्रसाद उंडे,अथर्व कॉम्प्युटर  यांनी केले आहे.
(ज्यानी पुर्वी फॉर्म भरले आहेत त्यांना कार्यक्रम स्थळी १०००० दिले जाणार आहे.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या