मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने वडगांव मावळ येथील सर्व रुग्णालयात उपचारासाठी अॅडमिट असणाऱ्या रुग्णांना हेल्दी फूड किट आणि गुलाबपुष्पचे मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर , वडगांव भाजपा शहराध्यक्ष किरण भिलारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
अनावश्यक खर्चाला बगल देऊन मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळा विश्वनाथराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमीत्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला असून याचा लाभ अनेक रुग्णांना होणार आहे असे मत भास्करराव म्हाळसकर यांनी व्यक्त केले
याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, नगरसेवक अॅड. विजयराव जाधव , प्रवीण चव्हाण , किरण म्हाळसकर , मावळ तालुका प्रसिध्दीप्रमुख अनंता कुडे , विठ्ठलराव घारे , युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे, व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा , विनायक भेगडे, शेखर वहिले , राजेंद्र गाडे ,आदी उपस्थित होते...
-----------------------------
वसुंधरा न्युज मावळ
-----------------------------
0 टिप्पण्या