कामशेत - कामशेत येथील आठवडे बाजार गेली आठ-नऊ महिन्यांपासून बंद आहे.त्यामुळे भाजी विक्रेते तसेच हातावर पोट असणारे किरकोळ व्यापारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.भाजी विक्री करण्यासाठी मंगळवारचा बाजार उपलब्ध नसल्याने विक्रेते इतर ठिकाणी पवनानगर रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बाजारपेठ,नाणेरोड अशा ठिकाणी रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेवर दुकाने टाकून भाजी विक्री करत आहे. त्यामुळे शहरातील पोलिस यंत्रणेला पण त्रास होत आहे.प्रत्येक दुकानांमध्ये चार फूट अंतर ठेवून रेल्वे स्टेशन लगत दैनंदिन बाजार चालू केला तर सोयीचे होईल असे निवेदन अभिमन्यू शिंदे यांनी तहसीलदार मधुसुदन बर्गे ,मावळ यांना निवेदन दिले आहे. तसेच गटविकास अधिकारी श्री भागवत यांना हि सदर निवेदन दिले आहे.
स्थानिक व्यवसायिक यांना व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी याबाबत योग्य तो आदेश खडकाळे ग्रामपंचायतींना देण्यात यावा.तसेच मंगळवारी भरवला जाणारा आठवडे बाजार चालू व्हावा अशी निवेदनात विनंती केली आहे.
0 टिप्पण्या