ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच राजकिय वारे वाहू लागले.ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी शंकल लढवत असतो अशीच शंकल मावळ तालुक्यातील दहिवली गावातील काही लोकांनी लढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
दहिवली गाव हे श्री क्षेत्र एकविरा देविस्थानच्या पायथ्याशी आहे.त्यामुळे येथे अनेक मुंबईकर लोकांचे बंगले आहेत आणि ह्याच संधीचा फायदा घेत,जे लोक येथे राहत नाही आणि विशेष म्हणजे ह्या लोकांचे मुंबईला मतदान असताना ग्रामपंचायत मध्ये दुबार नावे लावण्यात आली असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले त्यांनी ही बाब शासनाच्या निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी ही नावे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु ह्या मध्ये राजकिय दबाब तंत्राचा वापर होत असुन राजकीय नेत्यांच्या दबावाखाली संबंधित शासन अधिकारी मतदारयादी मधील दुबार नावे हटवण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.
ह्या गोष्टीवर योग्य ती कारवाई नाही झाल्यास पुराव्यानिशी सडे-तोड उत्तर दिलं जाईल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले
0 टिप्पण्या