Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनविशेष - हुतात्मा बाबू गेनू सैद स्मृतिदिन

हुतात्मा बाबू गेनू सैद स्मृतिदिन जन्म : १९०८(महाळुंगे, तालुका आंबेगाव,पुणे)

मृत्यू : १२ डिसेंबर १९३०(मुंबई)

नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य. मुंबई येथे गिरणीत कामाला असून उदरनिर्वाह करीत असत. पण मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले.

१२ डिसेंबर १९३० रोजी विदेशी कपडे घेऊन एक ट्रक आला. दुकानाकडे जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले. ट्रक पुढे जाऊ देईनात. उद्दाम इंग्रजी ड्रायव्हरने तो ट्रक या २२ वर्षाच्या तरूणाच्या अंगावरून पुढे नेला. बाबुगेनूंना हौतात्म्य लाभले.

----------------------------- 
वसुंधरा न्युज मावळ
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या