Ticker

6/recent/ticker-posts

झोपडीला लागलेल्या आगीमुळे आदिवासी कुटुंब बेघर


मावळ -रविवार दि०६/१२/२०२० रोजी दुपारी १.३०वा.सुमारास पारवडी लगत गायरानात राहणाऱ्या एका आदिवासी कातकरी समाजातील विधवा महिलेच्या झोपडीला अचानक आग लागली त्या आगीमध्ये पुर्ण झोपडी  व रोजच्या वापरातील वस्तु अन्नधान्य,कपडे,भांडी,अंथरून पांघरुन व मुलाच्या लग्नासाठी जमवलेले पैसे इत्यादी सर्व वस्तु आगीत भस्मसात झाल्या. या आगीने त्यांच्या स्वप्नांची व कुटंबाची राख रांगोळी झाली आहे.असे मत कुटुंब प्रमुख मंगल दुंदा वाघमारे,मुलगा तुकाराम दुंदा वाघमारे मुलगी पायल दुंदा वाघमारे यांनी व्यक्त केले.
सदर जळालेल्या घराची पाहणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंदर मावळ प्रखंडाचे मंत्री सुशील वाडेकर व बजरंग दल मावळ प्रखंड संयोजक महेंद्र असवले यांच्या मार्फत करण्यात आली व शासकीय स्तरावरील मदतीच्या पाठपुराव्याची हमी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने देण्यात आली.

वरील प्रसंगाला अनुसरुण आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटनेच्या माध्यमातुन समाजातील सर्व सामाजिक घटकांना असे आवाहन करतो की आपण या कुटुंबाला आर्थिक,धान्य स्वरुपात तसेच घर ऊभारणीसाठी आपल्या इच्छेनुसार मदत करावी.

संघटनेच्या वरील आवाहनाला सर्व स्तरातुन प्रतिसाद मिळेल असे मत मंगल दुंदा वाघमारे यांनी व्यक्त केले

मदती साठी संपर्क
सुशिल वाडेकर - ८८०५६३७५७५
तुकाराम वाघमारे - ९३५९७३५८०१

----------------------------- 
वसुंधरा न्युज मावळ
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या