कामशेत - कामशेत शहरात भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे ,मा.उपसरपंच गणपत शिंदे यांच्या संकल्पनेतून "आत्मनिर्भर भारत" या पथ विक्रेते योजना तसेच तरुणांना दहा लाखापर्यत व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी श्री गणेश मंगल कार्यालय, कामशेत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पथ विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी दहा हजार रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले.तसेच तरुणांनी व्यवसायाकडे वळावे आणि आपली प्रगती करावी यासाठी विविध कर्ज योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामशेत शहर अध्यक्ष मोहन वाघमारे यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे,पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुका अध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापक सुनील अहिवळे,जि.प.सदस्य अलकताई धानिवले,ज्येष्ठ नेते माऊली शिंदे,मा.सभापती राजाराम शिंदे,श्यामभाऊ राक्षे,शंकरनाना शिंदे,मा.सभापती सुवर्णा कुंभार,मा.सरपंच विजय शिंदे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारंगे,धनगर परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे,युवा नेते देवा गायकवाड, मा.उपसरपंच संतोष कदम,नितीन गायखे,वसंत काळे, सारिका घोलप,सारिका शिंदे,सुभाष गायकवाड,उपाध्यक्ष अंकुश तोंडे,रमेश बच्चे,गणपत बेनगुडे,कामशेत युवाध्यक्ष प्रफुल गदिया,जनाबाई पवार,काशिनाथ येवले,श्रीहरी गायकवाड,शंकर काजळे,बबलु सुर्वे,संजय लोनकर,शंकर पिंगळे ,प्रसाद उंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या