Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत उड्डाण पुल शेजारी खड्डा होतोय जीवघेणा - अभिमन्यु शिंदे, मा.उपसरपंच

कामशेत - कामशेत द्रुतगती मार्ग हा दिवसादिवस जीवघेणा होत असुन रोज अपघाताची संख्या हि वाढत आहे.पुलाचे काम चालु असुन  रोड शेजारी ड्रेनेजसाठी खोदकाम केले आहे तेथे चार ते पाच फुट खड्डा असुन त्या ठिकाणी  वाहनचालक यांच्या दुर्घटना होत आहे . तेथे कोणत्याही सुरक्षा साठी उपाय योजना केल्या नाहीत. याकडे MSRD या सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत असून आणखी किती अपघात होण्याची वाट पाहत आहे.आत्ता पर्यत दोन नागरीकांनी आपला जीव गमवला असुन काही जखमी झाले आहेत.

           या कडे प्रशासनाने लक्ष घालुन वाहनचालकांच्या  सुरक्षा संबंधित उपाय योजना कराव्यात लवकरात लवकर रोड ड्रेनेजच्या खड्डाचे काम पुर्ण करावे आशा सुचना   मा.उपसरपंच अभिमन्यु शिंदे यांनी केले आहे.
------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या