मावळ: तालुक्यातील आई एकविरा प्रतिष्ठाण, दहिवली (मावळ) या प्रतिष्ठाणाच्या वतीने सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२० पासून दर महिन्याला एक दुर्ग स्वछता अभियानाची सुरूवात कोराईगड या किल्ला पासून करण्यात आले.
प्रतिष्ठणाच्या तरुन व छोट्या मंडळींनी किल्ल्यावर जावून पर्यावरण संवर्धन जनजागृती आणि स्वच्छता करण्याचे काम करण्यात आले.गडांचे जतन व्हावे,गड परिसरातील वनसंपदा कायम राहावी ,पर्यावरण संवर्धन व्हावे ह्या ह्या उद्देशाने प्रतिष्ठाण कार्य करत आले आणि पुढेही करत राहील असे प्रतिष्ठणाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी गडाच्या पायथ्या पासून पायऱ्यांनी कचरा गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली प्रामुख्याने रिकाम्या पाण्याच्या बॉटल, चिप्स,बिस्कीट पॅकेटचा कचरा गोळा करण्यात आला ह्या वेळी अनेक त्या ठिकाणी आलेल्या पर्यटक लोकांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.व 2021 च्या जुलै महिन्यात कोराईगडावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला,विशेष म्हणजे लहान मुलांना किल्ल्यावरील कोराईमाता मंदिरात किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचन करण्यात आले
ह्यावेळी उपस्थित संजय येवले, सोमनाथ येवले,सागर शिंदे,तरस पाहुणे, कमलेशदादा,हर्ष येवले,आर्यन येवले व छोटे मंडळी होते
0 टिप्पण्या