मावळ - पुणे जिल्ह्यामध्ये १४०८ ग्रामपंचायती निवडणूका असून, त्यातील चौदाशे ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आठ डिसेंबरला तालुका ठिकाणी काढली जाणार आहे.
आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण गटासाठी ७५६ ग्रामपंचायती सरपंचपदे उपलब्ध आहेत त्यातील ३८३ सरपंच मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी तर ३७३ सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३४७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित आहेत त्यातील १७७ महिलांसाठी तर १७० नामाप्रसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी ५८ सरपंचपद आरक्षित आहेत त्यातील ते ३० महिलांसाठी आरक्षित असतील. अनुसूचित जातीसाठी १२५ सरपंच पदांपैकी ६६ पदे महिलांसाठी आरक्षित आहे. अनुसूचित क्षेत्रांमधील ११४ ग्रामपंचायती असून त्यामधील 58 सरपंच पदेही महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
Covid-19 बाबत आरोग्य विषयक सूचना आदर्श कार्यप्रणाली ,सुरक्षेचे नियम पाळून कार्यक्रम करावा अशा सूचना दिल्या आहेत.
---------------------
0 टिप्पण्या