मावळ - राज्यातील स्थगित ग्रामपंचायत निवडणूका दोन टप्प्यांमध्ये घेण्याबाबत निवडणूक आयोग विचार करत असून येत्या डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
गावात गावपुढार्याची मोर्चेबांधणीही चालू झालेली आहे उद्या दि.२४ रोजी सकाळी १० वाजता मतदार यादी वाचन ग्रामपंचायत खडकाळे मधे होणार असुन कामशेत मध्ये प्रभाग रचना बदल झाल्याने नक्की फायदा कोणाचा होणार वाढीव मतदान कोणाला होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सर्व पॅनल प्रमुख कामाला लागले असून सक्षम उमेदवार देण्यासाठी चढाओढ चालू आहे प्रामुख्याने सत्ताधारी परिवर्तन पॅनल विरुध्द स्व. दिलीप टाटीया पॅनल असे मुख्य लढत आहे परंतु राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाल्याने याचा गावकी च्या राजकारणात एकत्र येईल का ? जागावाटप समाधान होईल का..असे येत्या काळात पाहायला मिळेल .
परिवर्तन पॅनल यांनी कामशेट शहरातले रस्ते काँक्रिटीकरण केले आहे.समाज मंदीर सुशोभिकरण अशा विविध योजना राबवल्या आहेत याचा फायदा होईल का ? हे येत्या काळात पाहायला मिळेल मात्र इच्छुक उमेदवार वेट अँड वॉच मध्ये आहेत.
0 टिप्पण्या