कार्ला - भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी तालुका अध्यक्ष विकास लिंभोरे यांनी "भाजपा चा आधार , दिव्यांगांच्या उद्धार परिक्रमेच्या" अंतर्गत कुसगाव गण व वाकसई गणात दिव्यांग बांधवांची बैठक घेतली यामध्ये दिव्यांगांना शासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या समस्या , दिव्यांगांना मिळणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच संजय गांधी योजना अंतर्गत त्यांचे फॉर्म भरण्यात आले व ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी या बाबत विचार करण्यात आला तसेच विकास भाऊ लिंभोरे यांच्यावतीने काही दिव्यांग बांधवांना अवयव देण्यात आले.
परिक्रमामधे तालुक्यातून दिव्यांग बांधवांचा मोठा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे" या वेळी ज्या बांधवास अवयव पाहिजे असल्यास त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे प्रमुख उपस्थिती मधे गण अध्यक्ष शेखर दळवी,सुनिल कारके ,रविंद्र शिर्के, जगन्नाथ येवले, गट अध्यक्ष राजू शिंदे, प्रभारी संतोष राजवाडे, कार्याध्यक्ष रमेश येवले, उपाध्यक्ष किसन किसन येवले,तारासिंग बवरा आदी मान्यवर उपस्थित होते....
0 टिप्पण्या