महाविकासआघाडी सरकारला पार्ट्या चालतात, हॉटेल,ढाबे, बार सुरू आहेत. मग मंदिरे बंद का, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. भाजपा चे ही महाराष्ट्रात मंदीर उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन चालू आहे.लॉकडाऊननंतर पुनश्च हरि ओम म्हणत सरकारने नव्या जोमात सुरुवात केली.
मात्र 'हरि' बंदीवासातच राहीला आहे. अशी टिका मनसेने ही केली आहे सगळ्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री फेसबूक लाईव्हवर जनतेशी संवाद साधण्यासाठी आले. मात्र, देऊळे सुरू कधी करणार या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर मंदिरे खुली करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासन देणाऱ्या वक्तव्यावरच
बंडातात्या कराडकर यांनी जोरदार टीका केली.
देशभर मंदिरे सुरू झाली तरी महाराष्ट्रातील देव बंदीवासात असताना दिवाळी कशी साजरी करायची असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील मंदिरे नरकासुराने आठ महिने बंदीवासात ठेवली असताना कोणती दिवाळी साजरी करायची, असा प्रश्न बंडातात्या कराडकर यांनी उपस्थित केला. देवीची मंदिरे बंद असताना कोणत्या लक्ष्मीचे पूजन करणार, असेही त्यांनी विचारले. महाराष्ट्रात असुरांचे राज्य सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
0 टिप्पण्या