Ticker

6/recent/ticker-posts

महावितरण वाढीव विजबिल विरोधात वडगाव तहसिल कार्यालयावर भाजपा मावळ वतीने मोर्चा .. विज बिलांची केली होळी..



वडगाव मावळ(दि.२३ नोव्हेंबर ) - कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊनमध्ये राज्यभरात अनेकांना महावितरणच्या जास्त वीज बिलाचा फटका बसला. अनेकांनी ही वाढीव बिल भरली देखील. यातून सर्वांना दिलासा मिळेल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले पण अजूनही हे प्रकार संपत नसल्याचे दिसतय.रोजगार,कामधंदा या कोरोना काळात गेल्याने सर्वसामान्य नागरिक बिल कसे भरणार. काहींना पाच हजार ते तब्बल पन्नास हजारांचं बिल महावितरणने पाठवलेच्या घटना राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे बिलाचे पैसे आणायचे कुठुन ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना, शेतकऱ्यांना, हातावर पोट असनाऱ्या सर्वसामान्य परिवाराला  पडलाय. 

   राज्य  सरकारने ही शब्द फिरवला आहे .कोवीड काळातील सरासरी बिल दुरूस्त करुन वसुली करु नये,बजेटच्या वेळी १०० युनिट पर्यत आर्थिक दुर्बल घटकांना विज माफ करणे आशी वचने देऊन दिशाभुल केलेली आहे.
जर राज्यसरकारने वाढीव बिले कमी केली नाही तर मावळ तालुका भाजपा वतीने आम्ही रत्यावर उतरुन अधिक तीव्र अंदोलन करु, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ असे निवेदन मावळ तहसीलदारांना आज देण्यात आले.व वाढीव विजबिलांची होळी करण्यात आली.
 यावेळी मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे ,तालुका अध्यक्ष रविआप्पा भेगडे पं. स.सभापती निकीताताई घोटकुले, उपसभापती दत्ता शेवाळे, मा.सभापती गुलाबकाका म्हाळस्कर,सरचिनीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी,संघटनमंत्री किरण राक्षे,नगरसेवक अरुण भेगडे,अभिमन्यू शिंदे,अनंता कुडे, सुभाष धामणकर,मा.अध्यक्ष नारायण ढोरे,नगरसेवक किरण म्हाळस्कर, संपत म्हाळस्कर,क्रीडा आघाडी नामदेव वारींगे,शत्रुघ्न धनवे व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या