वडगाव मावळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव पक्ष कार्यालय मध्ये भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला .भाजपा तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण म्हणाले की "डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या आधुनिक बुद्धाने मानवतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून त्यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली, असे ते म्हणाले.
या वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे, पदवीधर संपर्कप्रमुख कल्पेश भोंडवे ,मयूर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या