कामशेत - सह्याद्री प्रतिष्ठान आणि सह्याद्री विद्यार्थी अकॅडमी आयोजित वतीने किल्ले स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये शिवप्रेमी यांनी आपल्या घराभोवती किल्ला करून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. सह्याद्री अकॅडमी च्या वतीने घरोघरी जाऊन परीक्षण करण्यात आले होते. याचे बक्षीस वितरण सोहळा दि.२२/११/२०२० रोजी शिवशंकर मंगल कार्यालय कामशेत मध्ये घेण्यात आला होता यामध्ये
प्रथम क्रमांक -अदित्य मोरमारे, द्वितीय क्रमांक- यश कदम ,समीर विश्वकर्मा, तृतीय क्रमांक - आरती खेंगले. उत्तेजनार्थ - अथर्व लोळे,निरज राणे, तसेच यामध्ये सहभागी प्रत्येक शिवप्रेमीस प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे इतिहासकार प्रमोद बोराडे,संतोष कुंभार,मा.उपसरपंच तानाजी दाभाडे, मा.उपसरपंच अभिमन्यु शिंदे,अषिश थोरात,संभाजी डांगे उपस्थित होते.
प्रास्तावना सचिन शेडगे ,सुत्रसंचालन लक्ष्मन शेलार ,आभार अंकुश काटकर यांनी केले या स्पर्धेचे आयोजन विशाल सुरतवाला, चेतन वाघमारे, राज बलशेटवार अश्विन दाभाडे , किशोर वाघमारे, संजय कटके, केदार दाखवे यांनी केले.
0 टिप्पण्या