Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार...

तळेगाव दाभाडे-   पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० च्या निमित्ताने भाजपाचे उमेदवार श्री संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील मावळ तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वैशाली मंगल कार्यालय,तळेगाव दाभाडे येथे आले असताना मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या दिव्यांग आघाडी तसेच विविध आघाड्यांच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्यासह भाजपा सरचिटणीस सुनील चव्हाण, व मच्छिंद्र केदारी, विदयार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, ओबीसी आघाडी अध्यक्ष रवी विधाते, भाजपा दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष विकास लिंभोरे,सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे,अध्यात्मीक आघाडी अध्यक्ष सुनिल वरघडे ,धनगर समाज परिषद अध्यक्ष नामदेव शेडगे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे, कामगार आघाडी कार्याध्यक्ष दत्ता गाडे, दिव्यांग आघाडी प्रभारी संतोष राजिवडे, कार्याध्यक्ष रमेश येवले, मातंग समाज परिषद अध्यक्ष सचिन भांडे, कामगार आघाडी उपाध्यक्ष किसन येवले आदी आघाडी पदाधिकारी होते.
---------------------
---------------------
------------------------

                 ------- × × × ------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या