Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठलस्वरूप जनार्दनबुवा बेल्हेकर.

विठ्ठलस्वरूप जनार्दनबुवा बेल्हेकर.

मावळ तालुक्यात सांस्कृतिक परंपरेला खंबीरपणे चालू ठेवणाऱ्या धुरंधर मंडळींपैकी बेल्हेकरबाबांचा सिंहाचा वाटा आहे..पहाटे तिन वाजता उठून काकडा आरती करुन देहूरोड डेपोत नोकरीला जात असत.. आम्ही सगळी मंडळी यांचं गाणं ऐकत मोठे झालोय..
पंडित भीमसेन जोशी मावळात भजनाला येत असत तेव्हा त्यांच्या साथीला बेलेकरबाबा असत.. आकाशवाणीवरही त्यांनी बरेच कार्यक्रम सादर केलेले आहेत..
मावळ परिसरात बेलेकरबाबांचा मोठा नावलौकिक होता.
आयुष्याच्या उत्तरार्धात ते बरेच दिवस आजारी होते.

काल गुरुवार दि. 12.11.2020 निज अश्विन शुद्ध द्वादशी या दिवशी दुपारी बाबांचं इहलोकातून परलोकात जाणं झालं.मावळाच्या भजनपाठातला हिरा आम्ही गमावलाय याचं खुप मोठं दुःख आहे.

भगवान  पांडुरंग परमात्म्याने त्यांना आपल्या चरणी विलीन करुन घ्यावं..

भावपूर्ण श्रद्धांजली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या