Ticker

6/recent/ticker-posts

पदाचा गैरवापर करून गोसेवकांना त्रास देणाऱ्या परंदवडी येथील पोलिस अधिकारी यांना निलंबित करा - मिलिंद एकबोटे

मावळ - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चार दिवसापूर्वी उर्से टोलनाका येथे गोमांस घेऊन चाललेला टेम्पो गोसेवक शिवांकुर खेर ,प्रतीक भेगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधिकारी यांच्या ताब्यात दिला असता त्यांनी कारवाई करण्याऐवजी परंदवडी पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे, किर्तिकुमार देवरे , बाळासाहेब जगदाळे यांनी उलट गोसेवक यांना दमबाजी केली. तुम्ही माझ्या हद्दी मध्ये गौ रक्षण करायचं नाही असा दम देत पकडलेला टेम्पो तसाच सोडून दिला .अशा अधिकाऱ्यांवर व  गौ रक्षकांवर झालेल्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी मावळ तहसील कार्यालय वडगाव येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल वतीने आंदोलन करण्यात आले . 

              अखिल भारत कृषी गोसेवा संघ अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी यावेळी मागणी केली गोसेवक हे रात्रंदिवस गोमातेची सेवा करत असतात यामध्ये पोलिसांचाही मोठा सहभाग आहे परंतु परंदवडी येथील पोलिसांचे असे वागणे हे चुकीचे आहे यांच्यावर  कारवाई झाली नाही तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त समोर आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.व वडगाव मावळ तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना लेखी निवेदन देण्यात आले.

                       या वेळी मिलिंद एकबोटे,शिवशंकर स्वामी,संतोष भेगडे ,संतोष दाभाडे ,अमोल पगडे ,नितिन महाराज काकडे,ज्ञानेश्वर महाराज दाभाडे,सुनिलमहाराज वरघडे,संदेश भेगडे ,बाळा खांडभोर ,मोरेश्वर पोफळे,गोपीनाथ कचरे मा.राज्यमंत्री बाळा भेगडे ,जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी अंदोलनाला पाठिंबा दिला तसेच बजरंगदल कार्यकर्ते ,गौ सेवक,विश्व हिंदू परिषद,मावळ तालुका वारकरी संघ यानी अंदोलनात सहभाग घेतला.

---------------------
---------------------
------------------------

                 ------- × × × ------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या