पुणे:-पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक घोषित करण्यात आली असून राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत. हे दोन्ही पक्ष उमेदवारी कोल्हापूर, सांगलीला देणार की पुण्याला हे पंधरा दिवसात निश्चित होणार आहे. काटाजोड लढतीची अपेक्षा असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावत पक्षीय नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
भारतीय जनता पक्षाकडून रविंद्र भेगडे , राजेश पांडे, शेखर चरेगावकर, माणिक पाटील चुयेकर, रोहन देशमुख, सचीन पटवर्धन, प्रसन्नजित फडणवीस अशी अनेक नावे चर्चेत असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पत्राव्दारे जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांनी पुणे जिल्ह्यातून मावळ तालुक्याचे अध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे यांच्या नावाची शिफारस केली आहे.
रवींद्रआप्पा भेगडे ह्यांना पुणे जिल्ह्यातील पदवीधर नोंदणीची जबाबदारी देण्यात आली होती.त्यानी शहर आणि ग्रामीण भागात दौरे करून ऑनलाइन आणि ऑफलाईन ४२००० पदवीधर मतदाराची नोंदणी केली.भारतीय जनता पक्षाचे ते निष्ठावंत कार्यक्रत्ये असून पक्षाच्या वतीने ते अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात.
0 टिप्पण्या