वडगाव मावळ -मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी १४०० कोटी रुपयांचा मंजुर कामांचा निधी आज वडगाव येथे पत्रकार परिषदेत जनतेसमोर मांडला.प्रत्यक्ष हा निधी १६०० कोटींच्या वर आला आहे.या वेळी बाळा भेगडे म्हणाले "विद्यमान आमदार यांनी या मंजुर झालेल्या विकासकामांचा अभ्यास करुन आमच्या समोरासमोर चर्चा करावी न आल्यास त्यांना विकासकामे मान्य आहे असे समजु"
विद्यमान आमदार यांनी ७०० कोटी रुपयाचा तरी हिशोब दाखवा असे अवाहन दिले होते.या मुळे तालुक्यात १४०० कोटी रुपया वर जणतेत चर्चा चालु होती आता हे दोन्ही नेते चर्चा साठी कधी एकत्र येतील हे पाहण्यासाठी नागरीकांमधे चर्चा चालु झाली आहे.
मावळ तालुक्यात अजुन विकासकामे चालु असुन काही कामांसाठी ठेकेदारांना १० वर्षे कालावधी दिलेला आहे आसेही सागितले .या वेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, उपसभापती दत्ता शेवाळे, जि.प.सदस्य नितीन मराठे, देहूरोड बोर्ड उपाध्यक्ष रघुवीर शेलार, पंचायत समिती सदस्य गुलाबराव म्हाळसकर,गणेश गायकवाड , शांताराम कदम, सुवर्णा कुंभार, संघटणमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनिल चव्हाण,मच्छिद्र केदारी, विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे ,सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,नितिन घोटकुले,देहुरोड अध्यक्ष बाळासाहेब शेलार,तळेगाव अध्यक्ष रविंद्र माने,किरण भिलारे,आनंता कुडे या प्रमाणे सर्व मंडल अध्यक्ष, गट व गणाचे अध्यक्ष, गटनेते,पत्रकार बंधु सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
0 टिप्पण्या