Ticker

6/recent/ticker-posts

मंदिर बंद, उघडले बारउद्धवा धुंद तुझे सरकार : गणेश भेगडे


जेजुरी : या मथळ्याखाली आज उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेरायाच्या मंदिराबाहेर मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले, वाघ्या मुरळी व लोककलावंतांच्या बरोबर लोकगीते गाण्यात आले,

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारू दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरे अद्याप बंद ठेवली आहेत. 'मंदिरं बंद अन् उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार', अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली आहे.

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिरं बंद ठेवली आहेत. या निर्णयाविरोधात आणि आमची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत. या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, सर्व धार्मिक संस्था-संघटना एकत्र येत अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात मंगळवारी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

 याप्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, ओबीसी सेल पुणे जिल्हाध्यक्ष सागर भुमकर, पुरंदर तालुका कार्याध्यक्ष निलेश जगताप, जेजुरी शहराध्यक्ष सचिन पेशवे, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे, तालुका सरचिटणीस श्रीकांत  थिटे, हवेली तालुका अध्यक्ष धनंजय कामठे, महिला अध्यक्ष मैनाताई जाधव, अलकाताई शिंदे, सुनीताताई कसबे, अशोक खोमणे, पांडुरंगजी रोडे, कार्याध्यक्ष गणेश भोसले, प्रसाद अत्रे, संदीप हरपळे, नदीम इनामदार. तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या