वडगाव मावळ - निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे चुकीचे पंचनामे करून शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात उद्या वडगाव तहसील कार्यालयावर मावळ भारतीय जनता पक्षाच्या वतीने आसूड आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे.
परंतु,आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच मावळ तहसीलदारांकडून सर्व तलाठ्यांना फेरपंचनामे एका दिवसात सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत.हा आदेश जारी करून पुन्हा एकदा तालुका प्रशासन घाईघाईने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे न्याय मिळणार नाही.त्यामुळे,उद्याचे आसूड आंदोलन अधिक तीव्रतेने होणार असून जोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पूर्ण भरपाई मिळवून न्याय मिळेपर्यंत भाजपा संघर्ष करणार आहे असे तालुका भाजपा वतीने सांगितले आहे.
उद्या सर्वांनी आपल्या न्याय हक्कासाठी हातात आसूड घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहा - रविंद्र भेगडे ,अध्यक्ष भाजपा मावळ
0 टिप्पण्या