Ticker

6/recent/ticker-posts

वडगाव मावळ - रविवार दि.५ आॅक्टोबर रोजी विशाल लॉन्स वडगाव,मावळ येथे जिजाऊंच्या लेकी महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्याचा उत्स्फूर्तपणे सहभाग.........◆ *५० रक्तदात्याचा उत्स्फूर्तपणे सहभाग....* ◆ *कार्यक्रमात संघटनेची कार्यकारिणी जाहीर....*

वडगाव मावळ -  रविवार दि.४आॅक्टोबर रोजी विशाल लॉन्स वडगाव मावळ येथे जिजाऊंच्या लेकी महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
        जिजाऊंच्या लेकी महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने कार्यक्रम करीत असताना सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून राजमाता जिजाऊ तसेच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वांना मार्गदर्शन केले.जिजाऊंच्या लेकी संस्थापक अध्यक्ष स्नेहल ताई नितीन दादा घोटकुले हे मनोगत व्यक्त करत असताना जिजाऊंच्या लेकी या संघटनेचे मूळ उद्दिष्टे सांगत असताना आपल्या मावळ तालुक्यातील मुली म्हणजेच सर्व जिजाऊंचे लेखी या सशक्त,समर्थ, स्वाभिमानी,स्वावलंबी,सुसंस्कृत समृद्ध,सुरक्षित करण्यास पूर्ण आयुष्य अर्पण करीत आहोत ही शपथ घेतली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जण मृत्यूच्या दारात आहेत आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून देशाला अर्पण करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.मुलींनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५० जणांनी सहभाग घेतला.
       याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुका सभापती निकिता घोटकुले तसेच भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुकाध्यक्ष सायली बोत्रे,मावळ तालुक्याचे उपसभापती दत्ता शेवाळे, डॉ.प्रतिक पलांडे,कुणाल येवले, करण भुजबळ, कुणाल हुलावळे, पवन मावळ महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी साठे, महिला आघाडी तालुका कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव,पवन मावळ महिला आघाडी उपाध्यक्ष रचना विधाटे,नाणे मावळ महिला आघाडी अध्यक्ष सीमा आहेर, विवेक गुरव (सर),पै.नामदेव वारींगे,मा.उपसरपंच अविनाश कारके,अतुल माळकर, गोधाम अध्यक्ष नितीन घोटकुले तसेच सर्व क्षेत्रातील विविध कार्य करत असलेले मान्यवर उपस्थित होते.
      कार्यकारणी पुढीलप्रमाणे :- जिजाऊंच्या लेकी महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष स्नेहल घोटकुले,मावळ तालुका अध्यक्षपदी प्रगती गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्ष सुषमा कारके यांची निवड करण्यात आली, तालुका कार्याध्यक्ष तालुका सचिव वैष्णवी येवले, तालुका सरचिटणीस पूजा वायकर, पवन मावळ अध्यक्ष आदिती  ठाकूर, उपाध्यक्ष अश्विनी  शिंदे, सोशल मीडिया अध्यक्ष ऋतुजा ठाकूर, नाणे मावळ अध्यक्षपदी अंजली आहेर, उपाध्यक्षपदी कोमल वाळुंज, सोशल मीडियाअध्यक्ष दिव्या आहेर,सचिवपदी मानसी  आहेर, अंदर मावळ अध्यक्ष कृषी धुमाळ,वडगाव शहर अध्यक्षपदी समीक्षा ढोरे,उपाध्यक्ष मानसी देशमुख,कार्याध्यक्ष शुभदा दरेकर, सचिव छाया पवार,सोमाटणे शहर अध्यक्षपदी दिपीका साठे, उपाध्यक्षपदी प्राजक्ता मोरे, तालुका विद्यार्थी अध्यक्षपदी सानिका सावंत यांची निवड करण्यात आली. तळेगाव शहराध्यक्षपदी शुभांगी बोरकर यांची निवड करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या