Ticker

6/recent/ticker-posts

वडगाव शहरातील स्मशानभूमीची डागडुजी व विद्युतदाहिनीचे रेंगाळलेले काम पूर्ण करण्यासाठी भाजयुमोचे नगरपंचायतीस निवेदन.......

वडगाव मावळ दि.०५:-शहरातील नागरीकांच्या अंत्यसंस्कारासाठी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीची झालेली दुरावस्था सुधारुन तेथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी वडगाव शहर भाजयुमोने वडगाव नगरपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
       पार्थिवाला अग्नी देण्याच्या ठिकाणच्या विटा निघाल्या आहेत तसेच भटक्या कुत्र्यांमुळे विसावा कट्ट्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून स्मशानभूमीची सुव्यवस्था राखण्यासाठी तेथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त करावा त्याचप्रमाणे विद्युतदाहिनीचे मागील चार वर्षांपासून रेंगाळलेले काम लवकरात लवकर पुर्ण करावे असे निवेदनात म्हटले आहे. 
      यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण भिलारे,सरचिटणीस रवींद्र म्हाळसकर,युवा मोर्चाचे अध्यक्ष रमेश ढोरे,नगरसेवक दिलीप म्हाळसकर,किरण म्हाळसकर,शरद मोरे,खंडू भिलारे,अनंता कुडे,भूषण मुथा,राजेंद्र म्हाळसकर,शेखर वहीले,कल्पेश भोंडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या