वडगाव मावळ दि.०३:- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या दुर्देवी घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीत तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चाने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
मानवतेला काळीमा फासून अमानुषपणाचा कळस गाठलेल्या हाथरस घटनेमुळे देशवासीयांच्या मनात संतापाची भावना आहे.संपुर्ण देशात अशा प्रकरणांमध्ये कुचकामी ठरणारे कायदे आणि विलंबित न्यायनिवाड्यांच्या प्रक्रियेमुळे महिलांच्या मनात तपास अधिकारी(पोलिस प्रशासन) आणि धीम्या न्यायव्यवस्थेविषयी चीड आहे.यास्तव दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी परीपुर्ण कायदेनिर्मिती करुन या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा
असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे,वैशाली म्हाळसकर,वैशाली ढोरे,आश्विनी बवरे,प्रियंका भोंडवे, शीतल मुथा यांच्यासह अनंता कुडे,प्रसाद पिंगळे,किरण म्हाळसकर,रवींद्र म्हाळसकर,मनोज गवारे ,कल्पेश भोंडवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या