Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व पंडीत दिनदयाल उपाध्याय जंयंती निमित्ताने सेवा सप्तहा कार्याचे "ई बुक"प्रकाशन


 वडगाव मावळ- भारतीय जनता पार्टी मावळ तालुका मासिक बैठक वडगाव पक्ष कार्यालय येथे सर्व प्रमुख मान्यवर,लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित पार पडली 
   यावेळी कोरोना काळात भारतीय जनता पार्टी मावळ च्या माध्यमातून तालुक्यातील सर्व घटकापर्यंत सेवाकार्य सुरु असून आज त्या सेवाकार्य पुस्तिकेचे प्रकाशन मा.मंत्री.बाळाभेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे व महिलाध्यक्ष सायली बोत्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

  तसेच भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने मावळ तालुक्यात सेवा सप्ताहाचे आयोजन आयोजन  करण्यात आले होते त्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला..
 
सोनम आबामोरे यांची पिंपरी-चिंचवड महीला आघाडी सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मावळ तालुका भाजपा वतीने सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी सभापती निकिताताई घोटकुले,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,मा.तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे,मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,शांताराम कदम,सरचटिणीस सुनील चव्हाण,मछिंद्र केदारी,कार्यध्यक्ष अर्जुन पाठारे,उपसरपंच अभिमन्यू शिंदे , क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,सोशल मिडीया अध्यक्ष सागर शिंदे, आनंता कुडे, सुमित्राताई जाधव,मा.अश्विनी ताई साठे,रचना विधाटे आदी लोकप्रतिनधी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या