Ticker

6/recent/ticker-posts

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेवटच्या व्यक्तीला मदत मिळेपर्यंत भाजपाचा लढा चालू राहणार:-आसूड मोर्चात भाजपाचा निर्धार.....

वडगाव मावळ दि.१६:- ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळातीळ खऱ्याखुऱ्या नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळाली नाही ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीचे परीपुर्ण पंचनामे न होता अनेक बनावट नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळाली.याच्या निषेधार्थ व नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या खऱ्या नुकसानग्रस्तांना  शासनाची मदत मिळावी यासाठी मावळ तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
            निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या शेवटच्या व्यक्तीला शासनाची मदत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
              यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,महिला मोर्चा अध्यक्ष सायलीताई बोत्रे,कार्याध्यक्ष सुमित्राताई जाधव,देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार,रघुवीर शेलार,लोणावळा शहर नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव,लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल,श्रीधर पुजारी,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,गणेश धानिवले,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम,उपसभापती दत्तात्रय शेवाळे,युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,अभिमन्यू शिंदे,नामदेव वारींगे,अनंता कुडे,विकास लिंभोरे,सागर शिंदे,सुमित्रा जाधव,प्रदीप धामणकर,बाळासाहेब घोटकुले,संतोष कुंभार,बिंद्रा गणात्रा,अर्चनाताई म्हाळसकर,सुभाष धामणकर,जितेंद्र बोत्रे,सुनिल वरघडे,संदिप पवार यांच्यासह तळेगाव,लोणावळा,देहूरोड,वडगाव येथील भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.किरण राक्षे यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या