Ticker

6/recent/ticker-posts

मा.मंत्री बाळा_भेगडे यांचा परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागात भेट ....अधिकाऱ्यांना दिल्या या सूचना


पवनानगर – भाताचे आगार समजले जाणाऱ्या मावळ तालुक्‍यात परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी राज्यमंत्री #बाळा_भेगडे यांनी रविवारी (दि. 18) पवनमावळ पूर्व भागातील चांदखेड परिसरातील आढले बुद्रुक, आढले खुर्द, पुसाणे, दिवड, ओवळे, डोणे, कुसगाव, पाचाणे गावांमध्ये पाहणी दौरा केला. त्यावेळी भातपिकाचे झालेले नुकसान पाहून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे हातातोडांशी आलेले पीक हे पावसात हातचे गेले आहे. झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांनी केलेला खर्चसुद्धा निघणार नसल्याने नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. याशिवाय सर्वांचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. 

या वेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण राक्षे, मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, सरपंच संदीप येवले,सूर्यकांत सोरटे, गणेश भोईर, यादव सोरटे, अमोल वाजे, विक्रम वाजे, प्रदीप वाजे, दत्ता केदारी, भारत घोटकुले, विश्‍वनाथ वाजे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या