कामशेत - कामशेत शहरात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या शासनाच्या उपक्रमास पहिल्याच दिवशी नियोजनाच्या अभावी भोंगळ कारभार पाहायला मिळाला आशासेविका,शिक्षक ,अंगनवाडी सेविका यांना सकाळी ७ वाजता बोलवण्यात आले होते परंतु तिथे प्रत्तेक्षात ११ वाजले तरीही नियोजनच चालले होते.प्रत्यक्षात तिथे काय प्रकार चालु आहे हे शिक्षक ,आशासेविका,अंगनवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांनाच माहीत होत नव्हते. कामशेत मोठे शहर असुन तिथे प्रशासकीय अधिकारी श्री दरोडे यांनी उपस्थित रहायला पाहीजे होते परंतु त्यांनी दिवसभर या शिबिराकडे डोकावून पाहिले ही नाही .
प्रशासनाने ग्रामस्थ आणि व्यापारी यांना विश्वासात घेतले नाही .प्रशासनाचे नियोजन शुन्य आणि ढिसाळ कारभार पाहायला मिळाला. कामशेत मध्ये तपासणी पूर्ण झाली नसून शिबिरातुन काहीही निष्पन्न झाले नाही. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.
0 टिप्पण्या