भारतीय महाक्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी दत्तात्रय नामदेव केदारी यांची निवड करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष अविनाश सकुंडे,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.आनंद गुगळे,राष्ट्रीय सरचिटणीस गणेश शिंदे यांनी त्याना निवडीचे पत्र दिले.
दत्तात्रय केदारी यांनी याआधी मावळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष पद भूषविले आहे.त्याच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यानी कर्जाच्या बोजाखाली अडकलेला खरेदी-विक्री संघाला पुनर्जीवित करण्याचे काम केले.अनेक सामाजिक कामात त्याचा नेहमी सहभाग असतो.त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या