कामशेत:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ यांच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत आशासेविका यांना मास्क, हॅन्ड ग्लोज,सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
मा. राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे आणि जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली मा.उपसरपंच अभिमन्यु शिंदे,मा.उपसरपंच गणपत शिंदे ,समीर भोसले यांच्या वतीने कामशेत शहरातील आशा सेविका यांना मास्क,हॅन्ड ग्लोज,सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
मावळ तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत प्रत्येक गृहतपासणी साठी आशा सेविका यांची नेमणूक केली आहे.कोरोना कालावधीत आशासेविका स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करत आहे.त्याच्या सुरक्षेसाठी शासनाने पीपीई किट,ग्लोज,सॅनिटायजर उपलब्ध केले नाहीत.तसेच त्याचे मानधन हि तुटपुंजे असून ते देखील वेळेवर मिळत नाही.लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्यन करणाऱ्या आशासेविका ह्या सुरक्षात्मक साधनांच्या अभावी असुरक्षित आहे.त्यांच्या सुरक्षितेसाठी भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ तालुका यांच्यावतीने त्यांना मास्क, हॅन्ड ग्लोज,सॅनिटायझर
देण्यात आलेले आहे.
0 टिप्पण्या