कामशेत शहरात " माझे कुटुंब माझी जबाबदारी " कोविड 19 अंतर्गत संपुर्ण शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. यासाठी बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 2020 रोजी संपूर्णतः शहर लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वताची तसेच आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करणे आपले हिताचे आहे. शहरातील सर्व 100% नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या दिवशी शहरातून बाहेर जाणारे रस्ते पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. कामावर जाणारे व कामानिमित्त घराबाहेर जाणारे नागरिक यांनी कामाचे ठिकाणी तशी पुर्व कल्पना द्यावी.
या दिवशी शहरातील सर्व दुकाने व आस्थपना बंद राहील. तपासणी फाॅर्म बिनचूक भरून आपल्या घरी आलेल्या सरकारी कर्मचारी/ स्वयंसेवक यांच्याकडे देणे बंधनकारक राहिल. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासन, शिक्षक वर्ग, आरोग्य आशासेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक, सहभागी होणार आहेत. तपासणी मध्ये करोणा सदृश्य लक्षणे आढळुन आल्यास रॅपिड टेस्ट व स्वॅप टेस्ट करण्यात येणार आहे. ह्या टेस्ट मोफत असतील किरकोळ लक्षणे असलेल्यांना मोफत गोळ्या देण्यात येतील. गरज भासल्यास दवाखान्यात नेण्याची सोय व लागणारा खर्च शासन करणार आहे. तसेच घरातील सदस्यांना उपचाराविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. तरी शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे अवाहन गणपत बाळकृष्ण(माऊली) शिंदे ,अभिमन्यू प्रकाश शिंदे. यांनी केले आहे.
0 टिप्पण्या