Ticker

6/recent/ticker-posts

कोविड सेंटरमध्ये महिलासाठी स्वतंत्र वार्ड तसेच सुरक्षेसाठी महिला स्टाफची नेमणूक करण्यात यावी यासाठी तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना देण्यात आले मावळ तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने निवेदन.......

वडगाव मावळ - महाराष्ट्र प्रदेश महीला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  मावळ तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गेपोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आज निवेदन देण्यात आले.
कोविड सेंटर मध्ये महिलांकरिता स्वतंत्र वार्डची निर्मिती करून तेथील सुरक्षितेकरिता महिला पोलीस स्टाफची नेमणूक करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. 
          सदर निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यातच कोविड केअर सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकूणच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने  कोविड केअर सेंटरमध्ये स्वतंत्र महिला वाॅर्ड निर्माण करण्याचे आदेश देऊन अंमलबजावणीकरण्यात यावी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला स्टाफ नेमण्यात यावा. 

 यावेळी मावळ तालुका भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, सभापती निकीता घोटकुले, प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव,प्रदेश सदस्या कोमल काळभोर,महिला आघाडी कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, महिला आघाडी पुणे जिल्हा सरचिटणीस श्रिया राहाळकर, मावळ भाजपा सरचिटणीस सुनील चव्हाण, सरचिटणीसि मच्छिंद्र केदारी, मावळ तालुका महिला आघाडी सरचिटणीस वैशाली ढोरे, सरचिटणीस अनिता सावले, संघटक सरचिटणीस कल्यानी ठाकर, उपाध्यक्ष शोभा भेगडे, नाणे मावळ अध्यक्ष सीमा आहेर,  पवन मावळ कार्याध्यक्ष रचनाताई विधाटे, तळेगाव महिला अध्यक्षा अंजली जोगळेकरसह महीला भगिनी उपस्थित होत्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या