Ticker

6/recent/ticker-posts

"जनता कर्फ्यू" कामशेत मध्ये कडकडीत बंद.....

कामशेत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कामशेतकर नागरिक,राजकिय प्रतिनिधी,व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी बैठक घेऊन दि.५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर अशा ६ दिवसाच्या "जनता कर्फ्युचे" आव्हान केले होते.या आव्हानाला प्रतिसाद देत कामशेतकर नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी कडकडीत बंद पाळला. कामशेत शहरातील नेहमी गर्दी असणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट ,मोकळे रस्ते दिसुन येतं होते.
      कामशेत शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली आहे.अनेक नागरिक, व्यापारी,पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.कामशेतमध्ये आतापर्यंत सुमारे १५० जणांना लागण झाली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी 'जनता कर्फ्यू' पाळण्यात आला."जनता कर्फ्युच्या" कालावधीत शहरातील दवाखाने व मेडिकल सुरू ठेवण्यात आली तसेच दूध व जनावरांच्या खाद्याची दुकाने, खते, बी-बियाणांची दुकाने सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधी दरम्यान सुरू ठेवण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या