या गर्दुल्यांमुळे तेथील स्थानिक रहिवासी यांना खुप त्रास सहन करावा लागत होता.यामुळे काही जागृत भगिनींनी याबाबत कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांना यासंदर्भात गुरुवारी निवेदन दिले होते. या निवेदनात सुनिता माने, लता भोरे, शैलेजा शहा, अंजली उबाळे, बायडा आहेरे, संजना नायर, चैताली पुजारी, दिपाली चौहान, सुजाता पोखरकर, चित्रा घारे, रिंकू भागवत यांच्या सह अन्य महिलांनी या आशयाचे सह्यांचे निवेदन पोलीस ठाण्याला देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
0 टिप्पण्या