आळंदी - एका बाजूला बेड मिळत नसल्याने कोरोना रुग्ण मृत पावल्याच्या बातम्या येत आहेत. दुसरीकडे सर्व व्यवस्था असूनही केवळ सरकारी अनास्थेमुळे व वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून न दिल्याने कोविड सेंटर चालू होऊ शकले नाही.
श्री क्षेत्र आळंदी तालुका खेड येथील एमआयटी कॉलेजमध्ये शंभर खोल्या आणि दोनशे बेड तयार आहेत. कॅन्टीन पूर्ण तयार आहे. स्वाब टेस्टिंगचे मशीन येऊन पडले आहे. पूर्ण रूम भरून औषधे तयार आहेत. केवळ महाराष्ट्र सरकारने वैद्यकीय स्टाफ उपलब्ध केलेला नाही त्यामुळे हे कोविड सेंटर चालू होऊ शकले नाही. खरंतर आळंदीच्या पंचक्रोशी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. परंतु बेड उपलब्ध होत नाहीत, काही रुग्णांचा जीव जाऊ शकतो.
आळंदीच्या नगराध्यक्षा व भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ. वैजयंता उमरगेकर यांनी विभागीय आयुक्तांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही.
पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष श्री गणेश भेगडे, नगराध्यक्षा सौ वैजयंता उमरगेकर व भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी निष्क्रिय सरकारचा जाहीर निषेध केला . तसेच कोविड सेंटरला भेट दिली. केवळ वैद्यकीय स्टाफ उपलब्ध नसल्याने हे कोविड सेंटर बंद आहे. या शासनाने दिखाऊ पणा न करता तातडीने चालु करावे .
0 टिप्पण्या