Ticker

6/recent/ticker-posts

मावळचे आमदार मावळातील शेतकऱ्यांसोबत की उपमुख्यमंत्र्यासोबत? :- रवींद्रआप्पा भेगडे(अध्यक्ष भाजपा मावळ तालुका)


मावळचे विध्यमान आमदार यांना याची कल्पना नसेल परंतु मावळच्या जनतेला याची पुर्ण कल्पना आहे की,तिकिटाच्या खेळासाठी कुणात बदल झाला! पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनावेळी मावळचे विद्यमान आमदार बंदिस्त जलवाहिनी विरोधी कार्यकर्ते होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत होते व अजित पवार उपमुख्यमंत्री होते.आज  महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि  अजित पवार हेच उपमुख्यमंत्री आहेत.विद्यमान आमदारांना खरोखरच मावळच्या शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द केल्याचा शासन आदेश आणून त्यांना निवडून दिलेल्या मावळच्या जनतेला दाखवावा. मावळ तालुकातील नागरिक त्यांचे जाहिरपणे स्वागत करतील  व मावळ भाजप त्यांचा जाहीरपणे सत्कार करेल. त्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी मावळमधील शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये.ते स्वतः प्रकल्पाच्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे जनतेसमोर जाहीर करावे.
             मावळ तालुक्यातील भारतीय किसान संघ,भाजपा,कॉंग्रेस(आय), शिवसेना,रिपाइं या पक्षांसोबतच तालुक्यातील जनतेचाही पवना बंदिस्त जलवाहिनीला कडाडून विरोध आहे.पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठ्यासाठी गहुंजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलावे परंतु थेट धरणातून बंदिस्त पाईपद्वारे पाणी उचलण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. 
                 पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलनात शहीद झालेले शेतकरी व जखमी आंदोलकांना न विसरता त्यांनी पवनेच्या पाण्यासाठी दिलेले बलिदान मावळवासीय वाया जावू देणार नाही याची जाणीव विद्यमान आमदारांनी ठेवावी. तसेच राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार आहे मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार आहे त्यामुळे भाजपच्या कुठल्याही पत्राची तालुका असेल किंवा राज्य असेल अपेक्षा ठेवू नये व उपमुख्यमंत्री त्यांचे, आमदार त्यांचेच. अशा वेळी त्यांनी प्रकल्प रद्द करून घ्यावा. भाजपच्या परवानगीची आवश्यकता ठेवू नये. मावळ भाजपा व मावळ तालुक्यातील असंख्य नागरिक, शेतकरी बंधू-भगिनी प्रकल्पाला कधीही समर्थन करणार नाही.आमची भूमिका कालही तीच होती.आजही तीच आहे आणि उद्याही अशीच राहणार!.पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द व्हावा. विद्यमान आमदारांनी प्रथमता त्यांची भूमिका स्पष्ट करावी की ते अजितदादा पवार यांच्या दबावामध्ये भाष्य करत आहेत की मावळच्या जनतेबरोबर प्रकल्पाला विरोध करणार?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या